पुणे : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या बोलण्यावरुन तसेच त्यांच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस फूट आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या पराभवानंतर अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. सध्या चर्चा सुरु आहे ती, अजित पवारांच्या गुलाबी कोटची.. अजित पवारांनी अलिकडे गुलाबी कोटचा वापर काहीसा वाढल्याचे दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खोचक टोला लगावला आहे.
अजित पवारांनी नुकत्याच बारामतीमध्ये झालेल्या जन सन्मान रॅलीमध्ये जास्तीत जास्ती गुलाबी रंगाचा वापर केला होता. बॅनर्स, जाहिराती, पोस्टर्स मंचावरही गुलाबी रंग अधिक प्रमाणात वापरल्याचे दिसत होते. त्यावरुन अमोल कोल्हेंनी टोला लगावला आहे. मतदारसंघामध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये गुलाबी रंग बिंबवण्याचे, तसेच महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अजित पवार गुलाबी रंगाचा वापर करत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. अजित पवारांनी तब्बल १२ गुलाबी कोट शिवून घेतल्याची माहिती आहे.
‘अजितदादा गुलाबी जॅकेट घालतात. त्यामागचा हेतू राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा असू शकतो. मात्र, तसं काही होईल असं मला वाटत नाही. कारण जॅकेट घालून कधी राजकारण होत नाही’ असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केल्यानंतर अमोल कोल्हेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘सध्या राज्यामध्ये तीन कावळ्यांचं सरकार आहे. महायुती ते तीन कावळे आहेत. भला न बोलो,भला न देखो, भला न सुनो या अविर्भावात ते वागतात आणि एकमेकांसोबतच त्यांची चढाओढ सुरू आहे’, असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा खेडकरांची जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात छळाची तक्रार; सुहास दिवसे म्हणाले,…
-विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य
-Pooja Khedkar: पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस; उद्या हजर राहणार का?