पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. इच्छुकांची सर्वसामान्यांपासून ते आपापल्या वरिष्ठांपर्यंत भेटीगाठी सुरु आहेत. त्यातच पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार या भाजपच्या माधुरी मिसाळ आहेत. या आमदार असताना पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक आणि पुणे मनपाचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी देखील तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. त्यातच आज माधुरी मिसाळ यांनी पर्वतीवर मी ठाम असल्याचे सांगितले आहे.
आज पत्रकारांशी बोलताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पर्वती जिंकू शकतो हे काही भाग नव्हतं. पर्वतीमध्ये आधी १० नगरसेवक आले नंतर २३ नगरसेवक आले. त्यामुळे जेव्हा वाळवंट असतं आणि शेती होणार नाही असं दिसतं तोपर्यंत कोणी लक्ष देत नाही पण जेव्हा शेत सुपीक दिसायला लागतं तेव्हा सगळेजण त्यावर तुटून पडतात. मी पर्वतीवर ठाम आहे, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत. यावर श्रीनाथ भिमाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून मला वरिष्ठांनी काम करायला सांगितले तेव्हापासून मी काम करत आहे. आता मी लोकसभेवेळीत निश्चिय केला आहे. पर्वती मतदारसंघातील घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. मला लढायचे असल्याचे मी वरिष्ठांच्या कानावर घातले आहे. मला विश्वास आहे मला नक्कीच संधी देतील. त्यांनी संधी दिली तर पर्वती मतदारसंघात मी लढणार पण आणि जिंकणार पण, असे श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.
‘मी पर्वतीमधून लढणार पण आणि जिंकणार पण’, असे माधुरी मिसाळही म्हणाल्याआहेत. यावर बोलताना श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘ही टॅग लाईन तर माझीच आहे. मला आशा आहे, खात्री आहे की वरिष्ठ मला नक्की पर्वती मतदारसंघाची उमेदवारी मिळेल. उमेदवारी मिळाल्यानंतर मी भरघोस मतांनी मी निवडून येऊ शकतो, असे श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा खेडकरांची जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात छळाची तक्रार; सुहास दिवसे म्हणाले,…
-विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य
-Pooja Khedkar: पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस; उद्या हजर राहणार का?
-भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे