पुणे : पुण्यातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. आता पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.
पूजा खेडकरचे आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पूजा खेडकरची निवड रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणावर आता माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पूजा खेडकर प्रकरण नुकतंच माझ्या वाचनात आले. यूपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे. ती कठोर पावले ते उचलताना दिसत आहेत. यूपीएससीच्या त्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, नियमानुसार असलेल्या संधीपेक्षा जास्त वेळा ते देखील फसवणूक करून संधी घेतली आहे. माझी यूपीएससीकडून अपेक्षा आहे, त्यांनी कठोरपणे कारवाई करावी, अशी मागणी अविनाश धर्माधिकारी यांनी केली आहे.
‘यूपीएससीवर असलेला विश्वास ते टिकवून ठेवत योग्य ती कारवाई केली जाईल. तर याआधी देखील अशी दोन ते तीन प्रकरणे समोर आलेली आहे. त्यांची नियुक्ती देखील रद्द करण्यात असल्याचे अविनाश धर्माधिकारी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पूजा खेडकरांची जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात छळाची तक्रार; सुहास दिवसे म्हणाले,…
-विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मिळाला बुस्टर; निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य
-Pooja Khedkar: पुणे पोलिसांची पूजा खेडकरांना दुसरी नोटीस; उद्या हजर राहणार का?
-भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे
-अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका