पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावत पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीनंतरही पूजा खेडकरने आपला वाशिममधील मुक्काम काही हलवला नसल्याचे दिसत आहे. पूजा खेडकर पुणे आयुक्तालयामध्ये हजर राहिल्या नसल्याने पुणे पोलिसांनी आता त्यांना दुसरी नोटीसही बजावली आहे.
पूजा खेडकरांनी आपला वाशिमचा मुक्काम आणखी २ दिवस वाढला असल्याची माहिती मिळत आहे. नोटीस बजावल्यानंतर तब्बल ६६ तास उलटून गेले तरीही पूजा खेडकर या वाशिममधील विश्रामगृहावर गोदावरी खोलीत आपला मुक्काम ठोकून आहे. आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या सर्व गोष्टी पूजा आपल्या खोलीमध्येच बोलून घेत असल्याची देखील माहिती आहे. गेल्या ६६ तासापासून पूजा खेडकर बंद खोलीत आहे.
पूजा खेडकरांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले असून या आरोपांचा लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी पूजा खेडकरांना नोटीस पाठवली होती. पुण्यात हजर न राहिल्याने पुणे पोलिसांनी पूजा यांना दुसरी नोटीस बजावत २० जुलैपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. यावर आता उद्या तरी पूजा खेडकर पुण्यात दाखल होणार की वाशिमचा मुक्काम आणखी वाढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे
-अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!
-नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच
-अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’