मुंबई | पुणे : राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी १५०० रुपये प्रति महिना देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ राबवणार असल्याची घोषणा केली. त्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवत लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न केला होता. त्यानंतर राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील लाडका भाऊ योजनेंतर्गत प्रतिमहिना ठराविक रक्कम देणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. त्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘भीक नको, रोजगार द्या’, असं म्हणत सडकून टीका करण्यात आली आहे.
आज केंद्रातील सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवत आहे. उद्या मुंबई पळवतील. महाराष्ट्रावर ८ लाख कोटींचे कर्ज आहे. मुंबईचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडले. देशाच्या आर्थिक राजधानीचे हे दशावतार झाल्यावर रोजगार येणार कोठून? तरीही नोकऱ्यांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटेल आणि भडकेल असे वातावरण आहे. म्हणूनच कर्नाटकातील भूमिपुत्रांच्या बाबतीत १०० टक्के नोकऱ्या राखीव करणारा निर्णय दिलासा देणारा वाटणे स्वाभाविक आहे, असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे.
पन्नास वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात पेरलेला विचार बाजूच्या कर्नाटकात बहरला आहे. जे कानडी मुलखात झाले ते महाराष्ट्रात घडेल काय? स्टायपेंडची भीक नको; हक्काच्या नोकऱ्या हव्यात, या विचाराने तरुण उभे राहतील काय? मुख्यमंत्र्यांनी पदवीधरांच्या खात्यात ६ हजार रुपये टाकण्याचा जुमला जाहीर केला आहे. पण या मुलांना नोकऱ्या हव्यात, भीक नको. राज्यकर्त्यांनी हे ६, १० हजार रुपयांचे दान आपल्या घरातील मुलांना द्यावे, अन् तेवढ्यात त्यांना आपले ५ जणांचे घर चालवायला सांगावे, असे म्हणत सामनामधून राज्य सरकारच्या या योजनवरुन सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!
-नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच
-अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’