पुणे : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण विभागाकडून १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. एकूण ६४२ अभ्यासक्रमांचा अभ्यास घेणाऱ्या मुलींना शंभर टक्के शुल्क माफी मिळणार आहे. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनीही थोडे थांबावे. शुल्क भरल्याशिवाय मुलींना प्रवेश न देणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या विषयातील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमावेळी बोलताना ‘शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. शासकीय संस्थांनी उद्योगांसोबत सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलींना पैसे न घेताच प्रवेश द्यायचा’, असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि शासकीय तंत्रनिकेतन पुणे यांनी उभारलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन तसेच बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचे आज उद्घाटन केले.
शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. जगभरात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता… pic.twitter.com/FpOzsQNdbi— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 16, 2024
केंद्र सरकारही शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधी देण्यास तयार आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन संस्थांनी नव्या कल्पना समोर आणाव्यात, त्यानुसार उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. त्यासाठी मंजूर केलेल्या ३ उत्कृष्टता केंद्रांपैकी पहिले पुण्यात सुरू होत आहे. ४१ तंत्रनिकेतनांमध्ये १ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सीईटीची क्षमता वाढवून संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मुर्ती विठ्ठलाची; आषाढी एकादशीचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
-पुण्यात चाललंय तरी काय? दोन अल्पवयीन मुली दारु पिल्या, झिंगल्या अन् दारुच्या नशेत…
-विठूरायाच्या पंढरीत ‘बीव्हीजी’ची स्वच्छता सेवा; बीव्हीजीचे ४०० स्वच्छता दूत सज्ज
-ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या