पुणे : राज्यात सध्या ओबीसी, मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान टोलेबाजी सुरु आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे मैदानात उतरले आहेत. राज्यात येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या हक्कांसाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ही यात्रा कोल्हापूरपासून सुरू होणार असून संभाजीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. छत्रपती संभाजी नगरमधून या आरक्षण बचाव यात्रेची प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.
‘ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे. एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप डबल करावी. केंद्राची स्कॉलरशीप मिळते, राज्याचा हिस्सा नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एससी एसटीची स्कॉलरशीप लागू करा. घाईगडबडीत फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट तो घाईगडबडीत दिला आहे. तो रद्द करावा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच. कारण ते ओबीसीत आहेत’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
‘शेवटी आरक्षण जे आहे, त्यात एससी एसटीला पदोन्नती तसेच ओबीसींनाही पदोन्नती मिळाली पाहिजे. या मार्चमध्ये आम्ही रयतेतील गरीब मराठ्यांना अपील करणार आहोत की, श्रीमंत मराठा तुम्हाला आतापर्यंत फसवत आला आहे. टिकाऊ आरक्षण दिलं नाही. तेव्हा ओबीसींच्या आरक्षणवाद्यांच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचे आरक्षणाचे ताट, टिकाऊ ताट, वेगळे आणि स्थायी करून देणार आहोत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट
-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?
-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!
-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण