बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, बारामतीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यातच आता बारामती शहरातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये कुस्तीची २ मैदाने होणार असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव जय पवार यांनी येत्या २८ जुलै रोजी कुस्तीचे मैदान आयोजित केले आहे. त्यावरुन हे मैदान बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्याशी चर्चा करून आयोजित केले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जय पवार यांनी कुस्तीचे मैदान आयोजित करण्याबाबत युगेंद्र पवार यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले की, याबाबत काही माहिती नाही. परंतु आपणही आणखी एक कुस्तीचे मैदान आयोजित करणार आहे. कुस्तीची अनेक मैदानी व्हावेत व त्याद्वारे आपल्या परिसरातील कुस्तीगिरांना संधी मिळावी हे काय वाईट नाही. त्यामुळे एकापेक्षा अधिक कुस्तीची मैदाने आयोजित झाली पाहिजेत. आपण देखील पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे कुस्तीचे मैदान आयोजित करणारच आहोत, असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
‘गेली अनेक वर्ष म्हणजे मी सात,आठ वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीचे मैदान सुरू केले. त्यानंतर गेल्या काही वर्षात मी देखील त्यात सहभागी झालो. आता ते मैदान जुनेच आहे, ते कोण भरवत होते ते सर्वांना माहित आहे. आता जे मैदान भरवले जाणार आहे, ते मात्र नवीन आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपले मैदान पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजित करणारच आहोत’, असे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केले.
‘बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची चर्चा माझ्या कानावर यापूर्वी देखील आली, परंतु माझ्यापर्यंत कोणतेही पत्र आलेले नाही. अर्थात आता आयोजित होणाऱ्या मैदानाबाबत आपल्याला विचारणा झालेली नाही’, असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!
-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण
-विधानसभेसाठी भाजपची तयारी; पुण्यात ठरणार रणनीती! नेमकं राजकारण काय?