पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या मोठी होत आहे. एकीकडे वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये मेट्रोचे जाळे देखील पसरत चालले आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा देखील मिळणार आहे. अशातच आता सध्या स्थितीला वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट यादरम्यान मेट्रो सुरू आहे.
अशातच आता पुणे मेट्रोचा शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट हा टप्पा देखील लवकर पूर्ण होणार आहे. आता स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पूर्णत्वास जात आहे. शहरामध्ये मेट्रोचे काम वेगाने होत असून वाहतूक कोंडी तसेच पुणेकरांना प्रवास सोईस्कर व्हावा या उद्देशाने मेट्रोचे काम होत असताना पहायला मिळत आहे. शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गाची ही भुयारी मेट्रो सुरू होणार आहे.
पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास !
पुणे मेट्रोचा शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट टप्पा लवकरच पूर्ण होत असून स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पूर्णत्वास जात आहे.
छायाचित्रे : आशिष काळे, महाराष्ट्र टाइम्स@narendramodi @mieknathshinde… pic.twitter.com/JOnwWdQhUX
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 16, 2024
नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात मेट्रो मार्गाची गेल्या काही दिवसांपूर्वी पाहणी केली. यावेळी मोहोळ यांनी मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा साडेतीन किलोमीटरचा बाकी राहिलेला टप्पा लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार असे सांगितले होते. त्यावर आता हे पूर्णत्वास जात असल्याचे मोहोळ यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
या मेट्रो स्टेशनचे ऑगस्टमध्ये उद्घाटन होणार आहे. या टप्प्यात एकूण ३ स्टेशन आहेत. पण सुरुवातीला जेव्हा हा मार्ग सुरू होईल तेव्हा २ स्टेशन सुरू होतील, उर्वरित १ स्टेशन नंतर सुरू होणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या भूमिगत मेट्रो मार्गाची प्रतीक्षा होती तो मेट्रो मार्ग आता पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. दुसरीकडे येरवडा स्टेशनचेही काम आता पूर्ण होत आले आहे. यामुळे हे स्थानक देखील लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण
-विधानसभेसाठी भाजपची तयारी; पुण्यात ठरणार रणनीती! नेमकं राजकारण काय?
-ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी