पुणे : लोकसभा निवडणूक झाली आणि राज्यात महाविकास आघाडीने चांगलाच विजय मिळवला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फूटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा उभारी घेत विधानसभेची चांगलीच तयारी केल्याचे दिसत आहे.
अजित पवारांनी १४ जुलै रोजी बारामतीमध्ये आपल्या पक्षातील सर्व मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांसह जन सन्मान सभा घेतली. ही सभा आटोपली अन् राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदी बागेत गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मोदी बागेत होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत नेमकी कोणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता अजित पवार गटाच्या प्रवक्यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या होत्या मात्र त्या अजित पवारांची बहीण नीता पाटील यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या, असे स्पष्टीकरण अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेसाठी भाजपची तयारी; पुण्यात ठरणार रणनीती! नेमकं राजकारण काय?
-ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी
-कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर भाजी विकून मुलाला शिकवलं अन् लेकानंही आईच्या कष्टाचं पांग फेडलं