पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचे प्रयत्न सुरु आहेत. महिलांना या योजनेचा लाभ घेताना कसल्याची प्रकारची गैरसोय किंवा अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक आणि पुणे मनपाचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्वात पर्वती विधानसभा मतदारसंधामध्ये माझी लाडकी बहिण योजना अभियान तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान गेल्या आठवडाभर राबण्यात आले. या अभियाचनाची यशस्वी सांगता झाली.
पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून दिनांक ७ जुलै ते १४ जुलै दरम्यान हे अभियान राबवण्यात आले. या अभियानाची सांगता झाली असली तरी यापुढील काळातही श्रीनाथ भिमाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे अभियान सुरू राहणार असल्याची माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे. या अभियानाची सांगता अरण्येश्वर येथील तावरे बेकरी जवळील केंद्रांवर करण्यात आली.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ३० केंद्रांच्या माध्यमातून या अभियानाला पर्वती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यात यश आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी घेतलेल्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य पोहोचाव्यात, हाच या अभियानाचा हेतू होता. नागरिकांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे भिमाले यांनी यावेळी सांगितले आहे.
गेल्या ७ दिवसांमध्ये या सर्व केंद्रांवर आलेल्या अर्जांची नोंदणी करण्यात आली. या नोंदणी केलेल्या सर्व नागरिकांना मतदार यादीमध्ये समावेश करणे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अभियान सप्ताहाचा समारोप झाला असला तरी हे काम यापुढील काळातही माझ्या मार्केट यार्ड, संदेश सोसायटीमधील जनसंपर्क कार्यालयात सुरू राहणार आहे. त्यामुळे या अभियानात ज्यांना सहभागी होता आले नाही अशा नागरिकांनी भिमाले जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.
दरम्यान, हे अभियान यशस्वी होण्यासाठी मदत केलेले सर्व कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे नगरसेवक व सर्व सहकाऱ्यांचे आणि या अभियानात सक्रियपणे सहभागी होत हे अभियान प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक बंधू भगिनींचे देखील भिमाले यांनी मनापासून आभार मानले.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेसाठी भाजपची तयारी; पुण्यात ठरणार रणनीती! नेमकं राजकारण काय?
-ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी
-कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर भाजी विकून मुलाला शिकवलं अन् लेकानंही आईच्या कष्टाचं पांग फेडलं
-वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा