Shree Swami Samarth : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य ऐकताच श्री स्वामी महाराजांची मुर्ती डोळ्यासमोर दिसते. श्री दत्त गुरुदेव दत्तांचा अवतार असणारे श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणाऱ्यांची वाढत आहे. स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये लीन होणारे भक्त संकट, दु:खापासून नेहमी लांबच राहतात. स्वामी महाराज त्यांच्यावर आपला कृपाशिर्वाद कायम ठेवतात.
स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की, आपण चांगले कर्म करत रहायचे त्याचे चांगले फळ कधी ना कधी तरी मिळणारच आहे. स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या सुखी, समाधानी जीवनासाठी उपदेश देत असतात. त्यामध्ये आज स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेले उपदेश आता आपण पाहणार आहोत…
“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचे भले (चांगले) झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
स्वामी म्हणातात तू विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी..
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
मी तुझ्या अंतरात्म्यात आहे. तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक मी कधीच होऊ देणार नाही.
कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेसाठी भाजपची तयारी; पुण्यात ठरणार रणनीती! नेमकं राजकारण काय?
-ओडिसामधील जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार तब्बल ४६ वर्षांनी उघडले; पाहा किती किलो सोने, चांदी
-कौतुकास्पद! पतीच्या निधनानंतर भाजी विकून मुलाला शिकवलं अन् लेकानंही आईच्या कष्टाचं पांग फेडलं
-वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा
-अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेबाबतच ‘ते’ वक्तव्य ठरु शकतं विधानसभेसाठी धोक्याचं!