मुंबई | पुणे : राज्य सरकारकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यात येणार आहे. या तीर्थ दर्शन योजनेतून राज्यातील ६० वयवर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देशातील तसेच राज्यातील प्रमुख तीर्थस्थळी जाण्यासाठी मोफत प्रवास करता येणार आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’तून प्रत्येक जेष्ठ नागरिकाला ३० हजार रुपये प्रवास खर्च राज्य सरकारकडून दिला जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांच्या ज्येष्ठ नागरीकांना राज्य सरकारकडून देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा प्रवास मोफत करता येणार आहे. देशातील प्रमुख चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा यांसारख्या तीर्थस्थळी जात असतात. मात्र अनेक गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे या ठिकाणे जाण्याचे स्वप्न तसेच राहून जाते. हेच स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळी जाण्याचा प्रवास मोफत करण्यासाठी ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवणार असल्याचे जाहीर केले आहे.
असेल प्रयत्न महायुतीचा
योग यावा प्रत्येकाला तीर्थदर्शनाचामहाराष्ट्रातल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”
राज्यातील त्याचबरोबर देशातील प्रमुख तीर्थस्थळांचं दर्शन ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती रू 30,000 इतका प्रवास… pic.twitter.com/EmWpJNL3bF
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 15, 2024
सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती मिळावी तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे या हेतूने राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी महायुती सरकारकडून करण्यात आली आहे. आता लवकरच ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील आणि देशातील तीर्थस्थळांचा प्रवास मोफत करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरस पसरतोय, डेंग्यूची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?
-राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी
-श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश