श्री स्वामी समर्थ : स्वामी समर्थ महाराजांचे कृपाछत्र कायम आपल्या भक्तांवर आहे. संकट हरणारे स्वामी महाराज प्रत्येक भक्ताचे दु:ख जाणतात. स्वामी महाराज आपल्या भक्तांवर जरी त्यांची कृपा कायम ठेवत असतात, तसेच त्यांच्या भक्तांचे जीवन अधिक सुखकारक होण्यासाठी मोलाचे उपदेश असतात. स्वामींचे उपदेश ऐकून आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तसा बदल केला तर स्वामींच्या प्रत्येक भक्ताचे जीवन बदलून जाते. आजही स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी मोलाचे उदेश दिले आहेत.
कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते
क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार
स्वामींचे ५ उपदेश
शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश: होय.
आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे ही सुद्धा ईश्वराचीच भक्ती आहे. त्यामुळे आपण आपले कर्तव्य नेहमी चोखपणे पार पाडले पाहिजे.
लक्षात ठेव सामर्थ्य गुरु वचनात असते. साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही.
आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस. पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याच बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असते, त्याचे हृदय निर्मळ होते. अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो.
कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जोपर्यंत स्वामी आहेत, तोपर्यंत कोणीही तुमचे काही वाकड करणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-लाडकी बहिण योजनाच बरखास्त करा, काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार; नेमकं कारण काय?
-मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीकेची झोड; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू…’
-अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल; बारामती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चेला जोर