पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बोलवलेल्या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेते गैरहजर होते. यावरुन महायुतीने महाविकास आघाडीवर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांना घेरले त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.
‘पवार गेले नाहीत, ते काहीही बोलत आहेत. ते आता आरक्षणावर बोलत आहेत. आरक्षणावर मी १० वर्षांपासून बोलत आहे, आरक्षणावर कुठे बोलले पाहिजे, आधी मोदी सरकारने १० वर्षात अनेक आरक्षण बिल आणले. त्यावर मी बोलले. प्रस्ताव नव्हता म्हणून बैठक गेलो नाही, आमंत्रण कुणाला दिलं माहिती नाही’, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी बैठकीचे आमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
या बैठकीसाठी मुख्यमंत्री यांनी एक फोन करावा, मला फोन केला तर मी जाईल, सर्व आरक्षणावर बैठकीत बोलले गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू पवार ६०वर्ष सत्तेत राहिले आहेत काही तरी क्रेडिट द्या’, असा टोलाही यावेळी सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
आरोप करणारे ते आणि क्लीन चीट देणार ते, मग आरोप केले की खरे याचा उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे, ते आरोप करत होते, त्यामुळे फडणवीसांना उत्तरे द्यावी लागतील. आम्हा सगळ्यावर आरोप केले आहेत, काश्मीर टू कन्याकुमारी आरोप केले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल; बारामती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चेला जोर
-शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत दमदाटी करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मनोरमा खेडकरांना नोटीस
-श्री स्वामी समर्थ: स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना आज काय उपदेश दिले आहेत? वाचा…