बारामती : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बारामतीमध्ये आज घेतलेल्या सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचे दिसून आले. आज अजित पवार यांनी आपल्या पक्षातील सर्व मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांसह बारामतीमध्ये राष्ट्रवादी जन सन्मान सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“महिला सक्षम आणि आत्मनिर्भर होण्यासाठी ‘लाडकी बहीण योजने’तून वर्षांला १८ हजार रूपये देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. पण, त्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे. तर, ‘लाडकी बहीण योजना’ पुढे चालणार आहे. हौशे, नवशे, गवशे येतील, काही सांगण्याचा प्रयत्न करतील, विश्वास ठेवून नका. हा अजितदादा शब्दांचा पक्का आहे. त्यात कुठेही बदलणार नाही,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही खोटे बोलणार नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येत असते, जात असते. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. एमएसपी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल अमित शाह यांची भेट घेतली व साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहे, हवसे, नवसे, गवसे येतील, पण अजितदादा हा शब्द देणारा आहे. ‘रोहित पवार म्हणाले की, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. विकासाचे ध्येय ठेवून पुढे जायचे आहे. मला बारामती बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांची जबाबदारी पाळायचे आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल; बारामती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चेला जोर
-शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत दमदाटी करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मनोरमा खेडकरांना नोटीस
-श्री स्वामी समर्थ: स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना आज काय उपदेश दिले आहेत? वाचा…
-IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढल्या; आई मनोरमा खेडकरांना पालिकेने बजावली नोटीस