पुणे : गेल्या दोन दिवस सर्वत्र आयएएस प्रोबेशनल अधिकारी पूजा खेडकर यांचीच चर्चा सुरु आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही आता वादाच्या भोवऱ्यात आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेडकर यांच्या बाणेर येथील घरावर आता पुणे पालिकेकडून घराबाहेरील अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
आयएएसमध्ये निवड होण्यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांवरून, तसेच अधिकारी म्हणून रुजू होण्याआधीपासूनच ही वाद निर्माण झाला आहे. चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पिस्तुल रोखणे आणि मारहाण करणे याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बाणेर परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट क्रमांक ११२ मध्ये मनोरमा खेडकर या रो–हाऊसमध्ये राहण्यास आहे. मात्र त्यांनी रो हाऊसच्या सिमा भिंतीला लागून असलेल्या फुटपाथवर ३ फूट रुंद, २ फूट उंची आणि ६० फूट लांबीचे बांधकाम केले आहे. हे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असून ते येत्या ७ दिवसांच्या आतमध्ये स्वखर्चाने काढून घेण्यात यावे, ७ दिवसांच्या आतमध्ये अनधिकृत बांधकाम काढून न टाकल्यास पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत काढून टाकेल जाईल, अशा आशयाची नोटीस पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर चिकटवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?
-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?