पुणे : आपल्या पाल्यांना कोचिंग लावणाऱ्या सर्व पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता समोर आली आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश परिक्षा सुरु झाल्यापासून ‘कॉलेज बंद अन् कोचिंग सुरु’ असे वातावरण आहे. त्यातच आता विद्यार्थी कॉलेजमध्ये जात नाही. दहावी पास विद्यार्थी लाखो रुपयांची फी भरुन थेट मोठ्या कोचिंगसाठी अॅडमिशन घेतात. पण कोचिंगसाठी अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी आता सावध होण्याची वेळ आली आहे. कारण पुणे शहरातील फिटजी कोचिंग क्लास एका रात्रीतून बंद झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शेकडो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन कोचिंगचे संचालक फरार झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फिटची कोचिंग सेंटर आहे. या कोचिंगमध्ये जेईईची तयारी करण्यासाठी ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घेतले होते. त्यासाठी पालकांनी लाखो रुपये शुल्क त्या कोचिंगमध्ये भरले. परंतु हे कोचिंग एका रात्रीतून बंद पडले. कोचिंगचे संचालक विद्यार्थ्यांची लाखो रुपये फी घेऊन फरार झाले आहेत. आता विद्यार्थ्यांचे पालक पोलीस ठाण्याच पोहचले आहेत. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आश्रू आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ‘पिंपरी चिंचवडमधील फिटजी कोचिंगमध्ये मुलीचा प्रवेश घेतला होता. आठवड्यापूर्वी कोचिंग सेंटरचे प्रमुख राजेश कर्ण यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी कोचिंग बंद होणार असल्याचे अनौपचारिक चर्चेत सांगितले. परंतु काही माहिती मिळण्याआधीच कोचिंगला कुलूप लावून संचालक फरार झाले आहेत, असे प्रीतम पांडे या पालकाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निकाल जाहीर होताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार; कोणत्या आमदारांनी कोणते मंत्रिपद?
-पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी यादी; विश्वजीत कदमांची बंधूसाठी फिल्डिंग?
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’त महत्वाचे ५ बदल; जाणून घ्या नव्या जीआरप्रमाणे काय आहेत बदल?
-पुणेकरांनो सावधान! झिका वाढतोय, शहरात रुग्णांचा आकडा १९ वर; वाचा सर्वात जास्त धोका कोणत्या भागात?