पुणे : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकींसाठी आज विधीमंडळ सभागृहामधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि कोणाची मते फुटणार यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता एकीकडे मतदानाचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा सभागृहातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
विधानसभा सभागृहात आमदार आपले म्हणणे मांडत असताना, संबंधित आमदाराच्या पाठिमागे बाकावर बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर आपल्या पर्समधून काही पैसे काढून फाईलमध्ये ठेवत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभर हा व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओसंदर्भात आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
व्हिडीओ बारकाईने बघा जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे. सभागृहात बाकावर बसलेल्या महिला आमदार फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवताना दिसत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे? pic.twitter.com/B39yaLClfU
— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) July 12, 2024
सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, असे मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण
-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु
-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ
-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’