पुणे : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पुणेकरांसाच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यवस्थेचा आणि सज्जतेचा आढावा घेतला आहे. ‘येत्या रविवारी हे नवे टर्मिनल कार्यान्वित होत असून हे टर्मिनल म्हणजे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणीनंतर व्यक्त केली आहे.
पुणे विमानतळावरील कार्यान्वित होण्यासाठी सज्ज असलेल्या नव्या टर्मिनलची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी पाहणी केली आणि आढावा घेतला.@MoCA_GoI@aaipunairport pic.twitter.com/wLQCeSZqOm
— Office of Murlidhar Mohol (@MurlidharOffice) July 12, 2024
पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
Inspected the preparations at Pune Intl Airport’s new terminal building with Airport director Shri. Santosh Dhoke & other officials. After completing all technicalities, the terminal is all set to be functional from this Sunday, 1 PM onwards.
Hon. PM Narendra Modi ji has always… pic.twitter.com/eanlpTyQCu
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 12, 2024
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच पुण्याच्या विकासाबाबत आग्रही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळाला आहे. नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही निरंतर सुरु राहील’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या सर्व तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण झाल्या असून येत्या १४ जुलैपासून हे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. @mohol_murlidhar @MoCA_GoI @aaipunairport #Pune pic.twitter.com/B34GeUGNjo
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 12, 2024
महत्वाच्या बातम्या-
-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ
-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’
-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे