पुणे : आएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचे आता अनेक कारनामे उघड होत आहेत. अधिकारी होण्याआधीच थाटात रुबाब दाखवणाऱ्या पूजा खेडकरच्या आईचा मनोरमा खेडकर यांचा पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर मुळशी तालुक्यामधील शेतकऱ्यांवर देखील जागा बळकावण्यासाठी हातात बंदुक घेऊन धाक दाखवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पूजा खेडकर यांचे आता बारामती कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाने बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघड केली आहे. तसेच, खेडकर कुटुंबाने मुळशीमध्येही अरेरावी आणि दमदाटी करुन जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे.
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याची माहिती विजय कुंभार यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक ८ मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर १४ गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी २०१० ते २०११ च्या दरम्यान खरेदी केली असल्याचे बोलले जाते आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्याने खेडकर यांचे बारामती कनेक्शन समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वती काँग्रेसलाच हवा! कार्यकर्ते म्हणतात, ‘उमेदवारी कोणालाही द्या, आमदार करणारच’
-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे
-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण