पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातून काँग्रेस कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते एकवटल्याचे दिसत आहे.
‘उमेदवारी कुणालाही मिळू द्या, आम्ही एकदिलाने काम करू’, असा निर्धार व्यक्त करताना यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षालाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा यासाठी एकीचे दर्शन घडवले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेशच्या महिला अध्यक्षा आणि पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे, स्नेहल पाडळे, युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष सौरभ अमराळे, घन:श्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, हेमंत बागुल आणि पर्वती ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सिंहगड रस्ता परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी येत्या विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळाला पाहिजे यासाठी लवकरच शिष्टमंडळासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेवून या मतदारसंघाच्या मागणीवर ठाम राहण्याचेही यावेळी ठरले.
यावेळी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी यंदा मी निवडणूक लढणारच हे यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.
‘पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आजही येथे काँग्रेस विचारधारेला मानणारे मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. ही सर्वांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी उमेदवारी कोणालाही मिळाली तरी चालेल मात्र सर्वजण एक दिलाने काम निश्चित करणार’ असे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-हातात पिस्तूल अन् शेतकऱ्यांवर दादागिरी; पूजा खेडकरांच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे
-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण
-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?