पुणे : सध्या सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरसह खेडकर कुटुंबाचे कारनामे देखील हळूहळू उलगडत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या या ट्रेनी आयएएस डॉ. पूजा खेडकरची सर्व स्तरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. पूजासह त्यांच्या कुटुंबियांची देखील आरेरावी, दमदाटी पहायला मिळाली आहे.
ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी अरेरावी केली त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातच आता मनोरमा खेडकरांचा एक जुना व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे पहायला मिळत आहे.
प्रोबेशनर आयएएस डॉ. पूजा खेडकर या अधिकारी होण्यापूर्वीच रुबाब झाडत होत्या. त्यानंतर त्यांच्या कारनाम्याचा उलगडा होत गेला. त्यातच आता आई मनोरमा खेडकर यांचा पुणे पोलिसांवर दादागिरी केल्याचा आणि मुळशीतील शेतकऱ्यांवर अरेरावी केल्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरांचा प्रयत्न असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. याच पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ कागदपत्र अत्यंत महत्वाचे
-दारु पिऊन गाडी चालवल्यास मिळणार ‘ही’ मोठी शिक्षा; पुणे पोलिसांचा मोठा निर्यण
-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?
-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!