पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीसोबतच अपघाताचेही प्रमाण वाढत आहे. त्यातच आता शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कठोर निर्यण घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक भीषण अपघात घडले आहेत. आता पुण्यात दारु पिऊन गाडी चालवणं चांगलंच महागात पडणार आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालवताना कोणी आढळून आल्यास त्याचा थेट वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अपघात होत आहेत. गेल्या ६ महिन्यांमध्ये १६४८ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारु पिऊन वाहणे चालवणे या प्रकरणी फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. पण, यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाऊ शकतो.
वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार काय म्हणाले?
‘पुणे पोलिस विभागामार्फत शहरातील विविध भागात अनेक कारवाया करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दारू पिऊन वाहन चालवणार्या वाहन चालकावर सातत्याने कारवाई केली जात आहे. त्या कारवाई बाबत सांगायचे झाल्यास मागील सात महिन्यांमध्ये एक हजार ६८४ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या संबधीत चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या बाबतचा अहवाल आरटीओ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्वांचे तीन महिन्यासाठी वाहतूक परवाना रद्द होणार आहे ”
एकदा झालेल्या कारवाईनंतर पुन्हा त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार असल्याचे समोर येत आहे. मात्र, तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘भाजपच्या वरिष्ठांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न’; खासदार अमोल कोल्हे असं का म्हणाले?
-आमदार महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; जाधववाडी-चिखलीत साकारणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय!
-भाजपच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, तरीही भाजपात निरुत्साहच? नेमकं कारण काय?
-महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला
-Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला; आणखी २ गर्भवती महिलांना संसर्ग