पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मतभेद होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करता महायुतीमधील भाजपच्या अमित गोरखे यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली आहे. त्यानंतरही पिंपरी-चिंचवडमधील भाजपमध्ये उत्साही वातावरण नसल्याचे दिसून येत आहे.
इतर वेळी आनंद साजरा करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपच्या निष्ठावंतांनी अमित गोरखे यांना उमेदवारी मिळाली तरीही जल्लोष केल्याचे दिसले नाही. या उलट उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी नाराजीच्या सुरात एक पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पाठवण्यात आले. त्याच पत्रावर सर्वांनी सह्या सुद्धा केल्याचे बोलले जात आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना १२वे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा; डॉक्टर, परिचारिकांचा निष्काळजीपणा गर्भवती महिलेच्या जीवावर बेतला
-Zika Virus: पुण्यात झिकाचा धोका वाढला; आणखी २ गर्भवती महिलांना संसर्ग
-सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन भास्कर जाधवही संतापले; म्हणाले, “चेंबरमध्ये बसून लोकांचे…”