पुणे : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबई महानगर परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार सुरु आहे. आजही पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील ५ दिवसांसाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अलर्टही जारी करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागात दिलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी २०५ मीमीहून अधिक पावसाची नोंद होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विजांच्या कडकडासह वाऱ्यांचा वेग ५० ते ६० कि.मी. प्रति तास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान उद्या सुद्धा कोकणामध्ये सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’
-जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?
-पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांंनी घेतलं ताब्यात
-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला