पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीला राज्यातील सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार विधानसभेसाठी चांगलेच सज्ज झाल्याचे दिसत आहेत. आपले पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी शरद पवारांनी सुरवात केली असल्याचे पहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या आमदाराच्या मदतीने कार्ला येथील एकविरा देवी ट्रस्टवर शरद पवारांनी आपल्या खासदाराची वर्णी लावली आहे. त्यानंतर आता अजित पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार लक्ष देऊ लागले आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडून नियोजन केले आहे. यासाठी पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची २० जुलैला मोठी सभा पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. यावेळी शक्ती प्रदर्शन केले जाणार असून या सभेसाठी २० हजाराहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेत अनिल परब अन् नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक चकमक; गोऱ्हे म्हणाल्या, ‘मी अनावधानाने…’
-जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?
-पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांंनी घेतलं ताब्यात
-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला
-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..