मुंबई | पुणे : राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये अनेक विविध मुद्द्यांवरुन तुफान कलगितुरा रंगला आहे. त्यातच विधानस परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंमध्ये किरकोळ वाद सुरु आहेत. शनिवारी भारतीय क्रिकेटसंघाच्या सत्कारासाठी आम्हाला विरोधकांनी बोलवलं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन विधान परिषदेमध्ये गदारोळ घातला. यावर वाद मिटवताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘मी तुम्हाला सरकारच्या वतीने निमंत्रण देते तुम्ही नक्की या.’
आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या बोलण्यातील चूक लक्षात आणून दिली. त्यावर नाराजीही व्यक्त केली. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी देखील ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.
अनिल परब आणखी काय म्हणाले?
“उपसभापतींनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती २ दिवसांपूर्वी म्हणाल्या की तुम्ही सभागृहात गोंधळ घालता कारण तुम्हाला उद्धव ठाकरेंना तुम्ही काय काम करता हे दाखवायचे असते. मग आता मी हे म्हणू का? की तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय, किती काम करता ते दाखवायचे असते म्हणून तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. असे म्हटले तर तुम्हाला किती राग येईल?” असे अनिल परब म्हणाले आहेत.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
“मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेले असेन. मी तसं काही बोलले आहे का हे तपासून काढून टाकते.” असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना ते वक्तव्य काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. अनिल परब हे नुकतेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला होता.
महत्वाच्या बातम्या-
-जगातील पहिली सीएनजी बाईक भारतात लॉन्च; बघा काय असतील वेगळे फिचर्स?
-पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांंनी घेतलं ताब्यात
-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला
-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..
-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं