नवी दिल्ली : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. अशातच सर्वसामान्यांचे बजेट कोसळते. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल वाहनांना पर्यायी वाहनांची मागणी बाजारात वाढत असते. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा खप हा वाढताना दिसत आहे. देशात सीएनजी वाहनांची देखील क्रेझ वाढत असताना जगातील पहिली सीएनजी बाईक आपल्या भारतात लॉन्च झाले आहे.
अशी जगातील पहिली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम १२५ लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी असे वेगळे टँक देण्यात आले आहेत. फ्रिडम १२५ ही बाईक ३ प्रकारामध्ये उपलब्ध आहे. सीएनजी टाकी सीटखाली ठेवण्यात आली आहे. पेट्रोल आणि सीएनजीसाठी २ स्वतंत्र स्विच आहेत. ही पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक आहे. या बाईकचे इंजिन पावरफुल असून या इंजिनला पूर्णांक ९.५ पीएसची पावर आणि ९.७ एमएमचा टॉर्च जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.
कंपनीने २ लिटरचे पेट्रोल फ्युएल टॅंक आणि २ किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. कंपनीने फ्रीडम १२५ NG04, फ्रीडम १२५ NG04 ड्रम एलएडी आणि फ्रीडम १२५ NG04 ड्रम या ३ प्रकारामध्ये ही बाईक लॉन्च केली आहे. डिसब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा २ प्रकारामध्ये ही बाईक लॉन्च करण्यात येत आहे. ही बाईक एकूण ७ कलर्समध्ये लॉन्च होत आहे.
२ किलो सीएनजीमध्ये ही गाडी २३० किलोमीटर पर्यंत धावणार तर बाईक फुल टँक पट्रोलमध्ये म्हणजे २ लिटर पेट्रोल आणि २ किलो सीएनजीमध्ये ३५ किलोमीटर पर्यंत होणार आहे. बजाजच्या या सीएनजी बाईकमध्ये पेट्रोल आणि सीएनजीसाठी एकच फ्युअल कॅप कव्हर आहे. या बाईकचे बेसिक मॉडेल हे ९५ हजार रुपयांना आहेत तर टॉप फिरिएंट १ लाख १० जार रुपयांना आहे. सध्या चालू झाला असून या दुचाकीचे टॉप फिरिएंट हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन: ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांंनी घेतलं ताब्यात
-लाडक्या बहिणींसाठी योजना मग लाडक्या दाजींसाठी काय?; अमोल कोल्हेंचा राज्य सरकारला खोचक टोला
-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..
-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं
-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’