पुणे : राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील या शेवटच्या अधिवेशनामध्ये अर्थमंंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक विशेष तरतुदी केल्या असून त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केल्या आहेत. राज्यातील महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ राज्य सरकारने जाहीर केली आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
‘राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणुन महिला भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली ही चांगली बाब आहे. परंतु, त्याच बहिणीचे म्हणणे असेल लाडकी बहीण म्हणून जेवढे देता तेवढं दाजींना शेतीमालाला भाव द्या, दुधाला भाव द्या’, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
‘ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी, शैक्षणिक वस्तू खरेदीत सवलत द्या, आरोग्य विभागात ताईसह दाजींना सवलत द्या’, राज्य सरकार बहिणींच्या या मागण्या मान्य करणार का? असा सवाल करत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वरुन अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांनी भर सभागृहात सांगितले, ‘भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं?’ वाचा सविस्तर..
-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं
-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’
-‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा
-सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’