मुंबई | पुणे : राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील या शेवटच्या अधिवेशनामध्ये अर्थमंंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक विशेष तरतुदी केल्या असून त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केल्या आहेत. राज्यातील महिलांसाठी दरमहा १५०० रुपये देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ राज्य सरकारने जाहीर केली आहे. यावरुन विरोधकांनी टीकेची झोडही उठवली आहे.
राज्यातील महिलांसाठी विषेश योजना जाहीर केली पण भावांचे काय? त्यांच्यासाठी काय योजना जाहीर केली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांनी मुलांसाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली आहे.
भावांना अर्थसंकल्पातून काय-काय मिळालं!@AjitPawarSpeaks#ncp #ncpspeaksofficial #ajitpawar #vidhansabha #budgetsession2024 #पावसाळीअधिवेशन२०२४ #MonsoonSession2024 #Maharashtra pic.twitter.com/LQyluaItvQ
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) July 8, 2024
हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी उभय अध्यक्ष महोदय खरंतर हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होतो तेव्हा माझा शेतकऱ्यांना उभा करण्याच्या करता काही निर्णय आम्ही घेतले आहोत. ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ ही आमच्या भावासांठीच आहे. १ रुपयात पीक वीमा योजना ही भावांसाठीच आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान हे बिनव्याजी पीक कर्ज हे शेतकरी भावांसाठीच आहेत, असे म्हणत अजित पवारांनी राज्यातील भावांसाठी राबवलेल्या योजनांचा पाढा वाचला असून विरोधकांच्या टीकेलाा उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: पुण्यात आणखी एक अपघात, २ ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना भरधाव कारने चिरडलं
-अजित पवारांच्या आमदाराचं ठरलंय; ‘विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मी…’
-‘पुढची निवडणूक बारामतीतून लढणार’; महादेव जानकरांची मोठी घोषणा
-सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ कॅचवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; ‘त्याने तो कॅच नसता घेतला तर….’
-विधानसभेची तयारी! ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट