पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगले यश मिळवले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची, नेत्यांची तयारी सुरु आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे विधानसभेला इच्छुक असणाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून भेटीगाठींच्या सत्र सुरू झाले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर रोज किमान २ तास भेटीगाठींसाठी काढावे लागत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक आहेत.
पुण्यातील ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार, चंद्रकांत मोकाटे यांच्यासारखे नेते शरद पवारांच्या भेटीला येताना दिसत आहेत. २ दिवसापूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पृथ्वीराज सुतार यांनी शरद पवारांची भेट घेतली.
येत्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरुन उमेदवारी निश्चित केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रिक्षा चालकांसाठी आमदार सिद्दार्थ शिरोळेंनी विधानसभेत केली ‘ही’ महत्वाची मागणी
-ऑन ड्युटी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकलं पेट्रोल अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?
-‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचंय, पण…’; अजित पवारांचा शरद पवारांना टोला
-‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला