पुणे : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये बोलताना आमदार सिद्दार्थ शिरोळे यांनी रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला वाहन योग्यता प्रमाणपत्र दंड त्वरीत रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ‘दररोज ५० रूपये अशा या दंडाच्या विरोधात देशभरातील रिक्षाचालक आंदोलन करत असून पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व रिक्षा संघटनांनी एकत्रित आंदोलन करत संप पुकारला’ असल्याची माहिती शिरोळे यांनी विधानसभेत दिली आहे.
रिक्षा चालकांना त्यांची रिक्षा प्रवासी वाहतूकीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागते. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने प्रमाणपत्र घेईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रत्येक दिवशी ५० रूपये याप्रमाणे दंड करण्याची तरतुद सरकारने अलीकडेच केली. ही तरतुद रिक्षाचालकांवर अन्याय करणारी आहे, सिद्दार्थ शिरोळे यांनी विधानसभेत सांगितले आहे.
रिक्षा चालली तर व्यवसाय होतो. दररोज कमवायचे व त्यातून घर चालवायचे असा हा व्यवसाय आहे. त्यात दररोज ५० रूपये याप्रमाणे दंड झाला तर गरीब रिक्षाचालकांना तो जमा करणे अशक्य होईल. त्यामुळे हा दंड रद्द करावा व रिक्षाचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऑन ड्युटी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकलं पेट्रोल अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?
-‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचंय, पण…’; अजित पवारांचा शरद पवारांना टोला
-‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला
-विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; छोटा राजनच्या नावाने धमकावणं पडलं महागात, नेमका काय प्रकार?
-अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपावर अजित पवारांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, ‘मी स्पष्टच सांगतो…’