पुणे : सध्या राज्यातील सर्व वारकरी भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या काटेवाडी या गावातून जात असते. त्यातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आमंत्रण दिले असून राहुल गांधी वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सामील होणार आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देत असताना शरद पवारांना टोला लगावला आहे.
‘आता सर्वांना वारीच्या पालखीत फिरायचे आहे, त्याशिवाय जयंतराव येणार हे कोणाला माहीती, पण मी जायला तयार आहे, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यातच अजित पवारांनी हसत हसत जयंत पाटील यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
जयंत पाटील यांनी ९ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, कोणाच्या तरी हाताखाली काम करताना सर्व काही पुढे न्यावे लागते. मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘दादांवर मोदी, फडणवीसांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यामुळे…’; सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला
-विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; छोटा राजनच्या नावाने धमकावणं पडलं महागात, नेमका काय प्रकार?
-अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपावर अजित पवारांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, ‘मी स्पष्टच सांगतो…’
-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर
-टिंडर डेंटिंग अॅपवरची ओळख महिलेला पडली महागात; वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार