पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालला आता न्यायालयाने आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. जमीन व्यवहाराच्या मध्यस्थी प्रकरणामध्ये एका व्यावसायिकाला कुख्यात गुंड छोटा राजनच्या नावाने धमकी देत १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी हा आदेश दिला आहे. लष्कर न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पोलिसांनी या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, लष्कर न्यायालयाचा आदेश रद्द करून विशाल अग्रवालला २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
विशाल अग्रवालला कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले होते. पोलिसांनी त्याला लष्कर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपावर अजित पवारांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, ‘मी स्पष्टच सांगतो…’
-पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार; जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनेच घेतला बळी, निघाला कोयता गँगचा मेंबर
-टिंडर डेंटिंग अॅपवरची ओळख महिलेला पडली महागात; वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार
-पुणे कार अपघात प्रकरण: अखेर २ महिन्यांनंतर बिल्डर पुत्राने लिहला ३०० शब्दांत निबंध
-राज्यात येत्या २ दिवसांत मुसळधार सरी बरसणार; ‘या’ भागात यलो अन् ऑरेंज अलर्ट