पुणे : पुणे शहरामध्ये गुंडगिरीचे प्रमाण वाढत आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवासांपासून कोयता गँगची दहशत सुरु आहेत. दिवसाढवळ्या कोयता गँग दहशत माजवत असतात, तर कधी भर रस्त्यात चिरडून मारण्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता सुशिक्षितांकडून देखील असे धक्कादायक प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे शहरातील शिकलेल्या डॉक्टरनेच कोयता हातात घेत तरुणावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्त आणि त्यांच्या २ गुंड साथीदारांनी मिळून प्रितेश बाफना याच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि त्याची हत्या केली आहे. या प्रकारमुळे पुणे पुन्हा एकदा हादरले आहे.
‘संबंधित फिर्यादी तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यामध्ये आता डॉक्टरांनी सुद्धा कोयता हातात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाघोलीमधील लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत पसरली आहे.
‘कोयत्याने दिवसाढवळ्या हल्ले होत असल्याने कोयता गँगचा सुफडासाफ करावा’, अशी मागणी पुणेकराकंडून होत आहे आणि अशातच आता थेट शिकलेला डॉक्टर कोयता घेऊन रस्त्यावर उतरल्याने पुणे शहराची वाटचाल होत आहे, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. प्रशासन आता पुणे शहरामध्ये सतत होणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी नेमके काय कठोर पाऊले उचणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टिंडर डेंटिंग अॅपवरची ओळख महिलेला पडली महागात; वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार
-पुणे कार अपघात प्रकरण: अखेर २ महिन्यांनंतर बिल्डर पुत्राने लिहला ३०० शब्दांत निबंध
-राज्यात येत्या २ दिवसांत मुसळधार सरी बरसणार; ‘या’ भागात यलो अन् ऑरेंज अलर्ट
-वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना फोन; अन् म्हणाले, ‘साहेब मला माफ करा’ का मागितली माफी?
-उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंना ऑफिस फोडण्याची धमकी; पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ