पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच नाही. शहरामध्ये गुन्हेगारी, बलात्कार, गुंडगिरीचे प्रमाण वाढतच आहे. त्यातच सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. पुणे शहरातील टिंडर डेटिंग अॅपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका घटस्फोटीत महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
रिलेशनशिप सुरु न ठेवल्यास महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार ३ डिसेंबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत वारंवार घडला आहे. ३५ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.४) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने महिलेला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
निलेशभाई पंजाभाई कलसरीया (वय-३० रा. विमाननगर, पुणे) याच्यावर आयपीसी ३७६, ३७६(१), ३७६/२/एन, ५०६ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा घटस्फोट झाला असून ती ११ वर्षाच्या मुलासोबत वानवडी परिसरात राहते. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे कार अपघात प्रकरण: अखेर २ महिन्यांनंतर बिल्डर पुत्राने लिहला ३०० शब्दांत निबंध
-राज्यात येत्या २ दिवसांत मुसळधार सरी बरसणार; ‘या’ भागात यलो अन् ऑरेंज अलर्ट
-वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना फोन; अन् म्हणाले, ‘साहेब मला माफ करा’ का मागितली माफी?
-उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंना ऑफिस फोडण्याची धमकी; पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ
-जेएम कॉर्नर चौपाटी पालिकेकडून जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामां विरोधात धडक कारवाई सुरूच