पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर असून पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कल्याणीनगर अपघातामध्ये अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवत दोघांना चिरडले त्यामध्ये दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बड्या बिल्डर पुत्राला अवघ्या १५ तासातच सुटका करण्यात आली. अल्पवयीन आरोपीला या अपघात प्रकरणावरुन न्यायालयाने अजब शिक्षा दिली होती. ती म्हणजे ३०० शब्द लिहण्याची… तसेच काही किरकोळ अटींवरुन आरोपीला जामीन देण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयावरुन देशभरातून संतापाची लाट उसळली.
अखेर या बिल्डरपुत्र अल्पवयीन आरोपीने तब्बल २ महिन्यांनंतर ३०० शब्दांचा निबंध लिहला आणि सादर केला आहे. अल्पवयीन बिल्डरपुत्राची काही दिवसापूर्वी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. सुटका करताना त्यावेळी त्याला काही अटी शर्थी घालून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्याने ३०० शब्दचा निबंध लिहून देण्याची अट होती.
या निंबधामध्ये अपघात घडल्यानंतर काय करायला हवे? किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी? या पद्धतीचा निबंध लिहणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने ३०० शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे. आरोपीचे आई- वडिल अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. या सर्व प्रकरणाची अद्यापही सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यात येत्या २ दिवसांत मुसळधार सरी बरसणार; ‘या’ भागात यलो अन् ऑरेंज अलर्ट
-वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना फोन; अन् म्हणाले, ‘साहेब मला माफ करा’ का मागितली माफी?
-उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंना ऑफिस फोडण्याची धमकी; पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ
-जेएम कॉर्नर चौपाटी पालिकेकडून जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामां विरोधात धडक कारवाई सुरूच
-धीरज घाटेंचे राजकीय आचरण मनोरूग्णासारखे, तत्काळ गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी