पुणे : पुणे शहरातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. येत्या ९ जुलैला ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतं. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोरेंविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोरेंचे कार्यालय फोडण्याची धमकी दिली गेली आहे. यावरुन आता पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हडपसरच्या वंचित आघाडीच्या सरोदे नावाच्या एका कार्यकर्त्याने चक्क कात्रडच्या मोरे बागेतील कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे. मोरे यांना मिलालेल्या या धमकीनंतर वसंत मोरे यांच्या समर्थकांनी कार्यालय परिसरात गर्दी केली आहे. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेत आता पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केला. तसेच महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असणाऱ्या वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीसोबत जात पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनंतर आता आज उद्धव ठाकरेंची भेट, शिवसेनेत प्रवेश आणि पुण्यातील २ विधानसभा मतदारसंघांवर दावा केल्यानंतर आता त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जेएम कॉर्नर चौपाटी पालिकेकडून जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामां विरोधात धडक कारवाई सुरूच
-धीरज घाटेंचे राजकीय आचरण मनोरूग्णासारखे, तत्काळ गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
-वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा
-पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अटकेची माहिती लपवली; नेमकं कारण काय?