पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणातील मोठी बातमी आता समोर आली आहे. बड्या बिल्डरच्या बापाच्या मुलाने अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवत दोघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर या आरोपी अल्पवयीन आणि बड्या बापाचा मुलाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातच आता पुणे पोलिसांनी या प्रकरणानंतर ठोस कारवाई झाली नाही.
विशाल अग्रवाल याच्या अटकेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ही गुप्तता नेमकी का पाळली? याबाबत ही पोलीस बोलायला तयार नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
नेहमी आरोपीला अटक केल्यानंतर त्याची माहिती पोलीस माध्यमांना देतात. मात्र या प्रकरणातील या बड्या आरोपीच्या अटकेची माहिती लपवल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केले जात आहे. जमीन व्यवहार प्रकरणात एका रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी ३२ लाख रुपयांना गंडा घटल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत इंदापूरच्या जागेवरुन वाद?; हर्षवर्धन पाटील अन् दत्ता भरणेंमध्ये बॅनर वॉर
-पुण्यात झिकाची रुग्णसंख्या वाढतेय; श्रीनाथ भिमालेंचं पालिका आयुक्तांना निवेदन
-अजितदादांनी जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण योजने’वर दादांच्या लाडक्या बहिणीची टीका
-‘विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या…’; अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल