पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यातच जागा वाटपावरुन पक्षांमध्ये अर्तगत वाद होताना पहायला मिळतात. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुती वाद होणार हे निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दत्तामामा भरणे इंदापूरमध्ये आमदार आहेत याच इंदापूरची जागा अजित पवार गटाकडे आहे. मात्र येथूनच भाजपचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
त्यामुळे इंदापूरच्या जागेवरुन महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. इंदापूर विधानसभेत दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांची लढत होणार असल्याचे संकेत त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावून दिले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात ‘आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा २०२४’ अशा आशयाचे बॅनर लावत पाटील अपक्ष लढणार असल्याचे संकेत दिले.
हर्षवर्धन पाटीलांच्या बॅनर शेजारीच दत्ता भरणे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. ‘आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं’ असा मजकूर आणि दत्तामामा भरणे यांचा फोटो असलेला बॅनर इंदापूर राष्ट्रवादीकडून लावण्यात आला आहे. काँग्रेसमधून भाजपध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी ३ वेळा अपक्ष लढत विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांचे चिन्ह विमान होते. तेच चिन्ह इंदापूरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर आहे. आता महायुतीकडून इंदापूरच्या जागेचा तिढा सुटणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात झिकाची रुग्णसंख्या वाढतेय; श्रीनाथ भिमालेंचं पालिका आयुक्तांना निवेदन
-अजितदादांनी जाहीर केलेल्या ‘लाडकी बहिण योजने’वर दादांच्या लाडक्या बहिणीची टीका
-‘विकासावर काम करतो, म्हणून विरोधकांच्या…’; अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल