भोपाळ : मध्यप्रदेशामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या महिला मृत समजून एका जळालेल्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र ज्या महिलेच्या नावाने विधी करण्यात आला ती महिला तर जिवंत असल्याचे उघड झाले आहे. नोएडामध्ये हि बेपत्ता झालेली महिला ‘लाडली बहन योजने’चे पैसे काढताना आढळून आली.
मध्यप्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या सुनील शर्माची पत्नी ज्योती शर्मा २ मे रोजी अचानक घरातून गायब झाली. त्यानंतर सुमील शर्मा आणि कुटुंबियांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर मेहगाव पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २ दिवसांनी कतरौल येथे शेतात एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला. पोलीस आणि कुटुंंबियांना वाटले बेपत्ता महिलेचा मृतदेह आहे म्हणून शर्मा कुटुंबियांनी त्यावर अंत्यविधी केले.
घटना घडून गेल्यावर काही दिवसांनी सुनील बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हा ज्योतीच्या खात्यातून २७०० रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्याला समजले. मध्य प्रदेशातल्या ‘लाडली बहना योजने’अंतर्गत मिळणारे पैसे अंगठ्याचा ठसा देऊन एका कियॉस्क सेंटरवर काढण्यात आले होते. ते सेंटर दिल्लीच्या जवळच्या उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर सुनील पोलिसांसह नोएडामध्ये गेला, तेव्हा फुटपाथवर तुटलेली चप्पल शिवताना ज्योती दिसली. ज्योतीला पकडून पोलिसांनी मेहगावला आणले. न्यायालयात नेल्यानंतर ज्योतीला माहेरच्यांकडे सोपवण्यात आलं. ५३ दिवसांनी ज्योतीचा शोध लागला. मात्र त्या वेळी जळलेल्या अवस्थेत सापडलेली महिला कोण होती, याचे गूढ पोलिसांना उकललेले नाही.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? आज मोरेंचा मोर्चा ‘मातोश्री’वर
-लढणार आणि जिंकणार! भिमालेंच्या रील्सने तापले पर्वतीचे राजकारण
-‘आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला महिन्याला…’; मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंवर प्रत्युत्तर
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’बाबत देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आवाहन; म्हणाले, ‘एजंटच्या…’
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलगिरीचं पत्र; निर्णय कधी?