मुंबई | पुणे : राज्याच्या विधीमंडळीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत राज्यातील महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्याा आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेतून राज्य सरकार राज्यातील महिलांना प्रति महिना १५०० रुपये देणार आहे. त्यावरुन विरोधकांनी या योजनेवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडूनन जाहीर करण्यात आलेल्या या योजनेवर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. राज्यातील बहिणींचा विचार केला पण भावांचं काय? असा सवाल विचारत शिंदेंवर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आता ६५ वर्ष करण्यात येत असल्याची आणि पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज विधानसभेत केली. जनतेचा विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या वाटचालीची त्रिसूत्री असल्याचेही… https://t.co/6rFOV7rYCV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
‘काही लोकं म्हणाले की, लाडक्या बहिणीचं झालं, लाडक्या भावांचं काय?, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना लाडकी बहिण योजना कशी काय कळायची’, असा जोरदार पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
‘आम्ही तेही केलंय. लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे. राज्यातील 10 लाख मुलांना अप्रेंटीशीप आम्ही देतोय, १० हजार ते ८ हजार रुपये दरमहा या तरुणांना मिळणार आहेत. त्याची अंमलबजावणी तत्काळ होण्यासाठीची व्यवस्था देखील आम्ही करत आहोत’, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’बाबत देवेंद्र फडणवीसांचे महिलांना आवाहन; म्हणाले, ‘एजंटच्या…’
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी सभापतींना दिलगिरीचं पत्र; निर्णय कधी?