पुणे : पुणे शहर हे सांस्कृतिक वारसा जपणारे आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच पुण्याची ओळख पुणेरी पाट्यांमुळे देखील आहे. नियम न पाळणाऱ्यांना शब्दांचा मारा पुणेरी पाट्यातून दिला जातो. तसेच सामाजिक विषयाकडे लक्ष वेधले जाते. या पुणेरी पाट्यांमध्ये दोन ग्रुपमध्ये लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.
पुण्यात २ वेगवेगळ्या पाट्या या दोन्ही ग्रुपने लिहिल्या आहेत. त्यातील मस्त ग्रुपच्या पाटीला त्रस्त ग्रुपने जोरदार उत्तर दिले आहे. पुणेरी पाट्यांची देशात, जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते. आजही दोन पुणेरी पाट्या लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावल्या आहेत.
”महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये” अशी पहिली पाटी मस्त ग्रुपने लावली आहे. त्या पाटीवर महिलांना उद्देशून लिहीले आहे. त्या पाटीला त्रस्त ग्रुपने उत्तर दिले आहे. मस्त ग्रुपने लावलेल्या पाटी शेजारीच त्रस्त ग्रुपने दुसरी पाटी लावली आहे. त्यावर असे लिहले आहे की, ”मन इतकं निखळ ठेवा की कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये.” त्रस्त ग्रुपच्या त्या पाटीत लिहिले आहे. दोन्ही पाट्यांची पुण्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
संभाजी भिडे काय म्हणाले?
पुण्यात मागील २ दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे धारकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ‘आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आणि हांडग स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. तसेच वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये’,असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या-
-”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा मुस्लिम महिलांना फायदा देऊ नये’; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी
-तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान