पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’मध्ये राज्य सरकारकडून काही विशेष अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आता पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी सरकारने ही योजना राबवली असून राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास अनेक समस्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अटींमध्ये आणखी एकदा बदल केला आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील गरजू व पात्र लाभार्थी विवाहित, पात्र विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व निराधार महिलांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांनी सोमवारी सकाळपासूनच तालुक्यातील सेतू, तलाठी आणि तहसील कार्यालयात गर्दी केली होती. यावर आता राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी आणखी सहज-सुलभ केली असून आता उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्रांची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आता या दोन्ही कागदपत्राशिवाय महिलांना या योजनेचा लाभ केवळ रेशनकार्डच्या झेरॉक्सची पूर्तता करुन करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगटऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला,… https://t.co/e6k2Q4w9wl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 2, 2024
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा मुस्लिम महिलांना फायदा देऊ नये’; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी
-तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
-पुणेकरांनो सावधान! शहरात झिकाचे रुग्ण वाढले; गर्भवती महिलांना जास्त धोका