पुणे : लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावरुन आता पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स उभारले. यावरुन धीरज घाटे यांना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मरणाची भाषा वापरत उत्तर दिले. त्यावर आता धीरज घाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘पुण्याला राजकीय संस्कृती आहे. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलणं योग्य नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणं हे म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्यांनी व्यसनमुक्तीवर भाषण करण्यासारखं आहे. गेल्या ते ३५ वर्षापासून संघाच्या संस्कारात काम करत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे कर्म काय करायची हे चांगलं माहिती आहे. तुम्ही आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल’, असे धीरज घाटे म्हणाले आहेत.
अरविंद शिंदे यांना त्यांच्या नेत्यावर केलेली टीका, चांगलीच झोंबलेली दिसत आहे. कारण त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे. आणि हिंदू धर्माचा अपमान झाल्यानंतर भाजपचा कोणाताही कार्यकर्ता शांत बसणार नाही. हिंदू धर्मियांवर केलेल्या टीकेला आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. शिंदेंचा तोल ढासळला असून त्यांच्या नेत्याने संसदेत जसं विधान केलं तसंच आपणही काहीतरी माध्यमांसमोर बरळून चर्चेत यायचं हेच अरविंद शिंदे यांनी पुण्यात केलं आहे.
अरविंद शिंदे काय म्हणाले?
“भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर करणार होते, तुझं वागणं नेमकं काय आहे हे त्यांना विचारा. तू एकटा फिरू शकत नाही. कधी तू मरशील हे माहित नाही. भाजपचे सर्व लोक बॉडीगार्ड घेऊन फिरतात, कारण यांचे कर्मच तशी केली आहेत” असे वादग्रस्त विधान अरविंद शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-”मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चा मुस्लिम महिलांना फायदा देऊ नये’; मनसेच्या ‘या’ नेत्याची मागणी
-तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
-पुणेकरांनो सावधान! शहरात झिकाचे रुग्ण वाढले; गर्भवती महिलांना जास्त धोका