पुणे : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राजाचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या अनेक योजना जाहीर केल्या. या योजनांपैकी महाराष्ट्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकारने विशेष योजना राबवली जाणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना.’ या योजनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची जोड उठवली. त्यातच आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची राज्यात अंमलबजावणी होण्याआधीच मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे.
‘राज्य सरकारने दोन बायका आणि दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लिम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केले आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर राज्य सरकारचा काय निर्णय घेणार हे पहावे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ही एका उदात्त हेतूने सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील महिला सक्षम होतील. पण राज्य सरकारने या योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्राची घातलेली अट गरजेचे आहे. कारण या प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास राज्याबाहेरील लोक देखील याचा फायदा घेतील’, असे मतही प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
-पुणेकरांनो सावधान! शहरात झिकाचे रुग्ण वाढले; गर्भवती महिलांना जास्त धोका
-Pune Hit & Run: आरोपीच्या वडिल, आजोबांना जामीन मंजूर; विशाल अग्रवालची पोलीस कोठडी कायम