पुणे : पावसाळा सुरु झाला की पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. पर्यटक उत्साहाच्या भरात स्टंटबाजी करायला जातात. नुकत्याच लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील पर्यटनस्थळी जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ८ ही तालुक्यांमधील एकाही पर्यटनस्थळी ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी २ दिवसांत २ दुर्दैवी घटना घडल्या असून ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, त्यात पोहणे, इत्यादींवर आता बंदी घालण्यात आली आहे. तसेच धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि नैसर्गिक धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत हे आदेश पाळणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या पर्यटन स्थळांवर आदेश लागू
आंबेगाव : भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंढवळ धबधबा.
खेड : चासकमान धरण, भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे, जंगल परिसर.
इंदापूर : कुंभारगाव बोटिंग क्षेत्र.
मावळ : भुशी धरण आणि गड किल्ले परिसर, वडगाव मावळ येथील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे, लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरणं, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, राजमाची पॉइंट, सहारा पूल, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर आणि लोणावळ्याच्या वन क्षेत्रातील पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर बंदी घालण्यात आली आहे.
मुळशी : मुळशी धरण, ताम्हिणी घाट जंगल परिसर, मिल्कीबार धबधबा.
हवेली : खडकवासला धरण, वरसगाव धरण, सिंहगड.
जुन्नर : माळशेज घाट, धरणे, गडकिल्ले परिसर, शिवनेरी, माणिकडोह.
वेल्हा : धरण, गडकिल्ले कॉम्प्लेक्स, कातळधारा धबधबा.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: आरोपीच्या वडिल, आजोबांना जामीन मंजूर; विशाल अग्रवालची पोलीस कोठडी कायम
-मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त मोठे बदल; शिंदेंची विधानसभेत घोषणा
-अंबादास दानवे जनतेच्या न्यायालयात जाणार; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘महिलांच्या चपला खायच्या असतील तर…’
-अंबादास दानवेंची सभागृहात शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; ‘मी आई-बहिणींची माफी मागतो, पण…’
-लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी