पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे महिलांचे सबलीकरण होणार आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. तरीही या योजनेमध्ये २ मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यात १ जूलैपासून ‘मुख्यमंत्री लाडकी योजना’ राज्यभरात लागू होणार झाली आहे.
या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट ६० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमार्यादा ६५ वर्षे इतकी करण्यात आली आहे. तसेच जमिनीच्या मालकीची अट देखील काढून टाकण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.
वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या व ६० वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. आता ही वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. तर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अंबादास दानवे जनतेच्या न्यायालयात जाणार; प्रवीण दरेकर म्हणाले, ‘महिलांच्या चपला खायच्या असतील तर…’
-अंबादास दानवेंची सभागृहात शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; ‘मी आई-बहिणींची माफी मागतो, पण…’
-लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी
-अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट