मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित केले आहे. यावर अंबादास दानवे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून जनतेच्या न्यायालयामध्ये जाणार असल्याचे म्हणाले आहेत. यावर आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘जनतेच्या न्यायालयात महिलांच्या चपला खायच्या असतील तर, मला वाटतं त्यांनी जावंच आणि महिला भगिनींसमोर जाऊन आपण सभागृहात घातलेल्या शिव्या या घातल्या होत्या की नाही याचा प्रायचित्त घ्यावं. मग महिला भगिनी त्यांचे फुलांनी स्वागत करत आहेत की चपलांनी करतायेत हे पाहिला मिळेल. म्हणजे ‘गिर गया तो भी टांग उपर’ असं आहे’, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
जनतेच्या न्यायालयात महिलांच्या चपला खायच्या असतील तर अंबादास दानवे यांनी नक्की जावे आणि महिला भगिनींसमोर जाऊन आपण सभागृहात घातलेल्या शिव्या ह्या घातल्या होत्या की नाही याचे प्रायश्चित्य घ्यावे. pic.twitter.com/j77z9sRn3I
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 2, 2024
‘एखाद्याने शिव्या दिल्यानंतर चूक झाली त्याचे परिमार्जन आपण करतो. मी उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देईन, एक पक्षप्रमुख म्हणून त्यांना याचे गांभीर्य कळले या प्रकाराची त्यांनी माफी मागितली. परंतु या ठिकाणी निर्लज्जासारखा विरोधी पक्षनेता जनतेच्या न्यायालयात जर जाईन म्हणत असेल तर याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणा असू शकत नाही. म्हणजे शिव्या आपणच घालायच्या आणि जनतेच्या न्यायालयात जाईल असे म्हणत वर परत नाकांना टेंबा मिरवायचा, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अंबादास दानवेंची सभागृहात शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; ‘मी आई-बहिणींची माफी मागतो, पण…’
-लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश; नवी नियमावली केली जारी
-अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट
-पुण्यातील मेट्रो स्थानकावर घडली मोठी घटना; प्रवाशाला गमवावा लागला जीव, वाचा नेमकं काय झालं?